साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे करोना पॉझिटिव्ह, केलं महत्त्वपूर्ण आवाहन

 

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे करोना पॉझिटिव्ह, केलं महत्त्वपूर्ण आवाहननगर: साईबाबा संस्थानचे  अध्यक्ष व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे  यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.दोनच दिवसांपूर्वी काळे यांनी अन्य विश्वस्तांसह संस्थानचा कार्यभार स्वीकारला होता.

आशुतोष काळे यांनी म्हंटले आहे की, 'माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. श्री साईबाबांच्या व आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल.'

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post