राज्यात नावाजलेल्या नागरी सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासकाची नियुक्ती

 द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासकाची नियुक्तीबीड : द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.  बँकेच्या कामकाजात तक्रारी आल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार आयुक्तांनी ही कारवाई केलीय. 

 मागील अनेक वर्षांपासून सुभाष सारडा यांचेच या बँकेवर वर्चस्वर आहे. या बँकेचे हजारोंच्या संख्येने ठेवीदार असून त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून बँकेच्या कामकाजामध्ये अनेक तक्रारी आल्या होत्या. याच तक्रारींची दखल घेत रिझर्व्ह बँकेने मंत्री सहकारी बँकेवर प्रशासक नेमला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार आयुक्तांनी या बँकेवर जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांना प्रशासक म्हणून नियुक्त केलं आहे. प्रशासक देशमुख यांनी ग्राहकांना  घाबरण्याचं कारणं नसल्याचं म्हटलं आहे. बँकेची परिस्थिती उत्तम आहे. लवकरच बँक पूर्ववत होईल असे देशमुख म्हणाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post