नगर शहरातील रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी...

 ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे रस्ते विकासासाठी 50 कोटी

विशेष निधीची महापौर रोहिणी शेंडगे यांची मागणी     नगर - नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी भेट घेऊन नगर शहरातील रस्त्यांच्यासाठी विशेष निधीतून सुमारे 50 कोटी रुपयांची मागणी केली. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय शेंडगे उपस्थित होते.

    ना. एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिकेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेची सत्ता स्थापना झाली आहे. मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे व आपल्या सहकार्यामुळे नुकताच महापौर पदाचा पदभार स्विकारला आहे. नगर शहरातील नागरिकांना शिवसेनेकडून विकासाची मोठी अपेक्षा आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत शासनाच्या अमृत योजने अंतर्गत भुयारी गटार योनेचे काम सुरु आहे. सदर योजनेचे कामामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरातील खड्डयांचा पाण्यामुळे अंदाज येत नाही. त्यामुळे छोट-मोठे अपघात होत आहेत.

    शहरातील नागरिकांची रस्त्यांची दुरुस्ती होणेबाबत मागणी वाढत आहेत. सदरील रस्ते दुरुस्त करणे आवश्यक असून, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने महानगरपालिका निधीतून हे रस्ते दुरुस्त करणे शक्य नाही. या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधींची आवश्यकता आहे. शहर व उपनगरातील मुख्य रस्त्यांचे क्रॉक्रीटीकरणच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिल्यास रस्त्याचे काम करणे शक्य होईल व शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होईल. तरी यासर्व कामासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली.

    याप्रसंगी ना.एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लवकरच निर्णय घेऊन निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करु, असे आश्वासन दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post