बोगस ऊसाच्या नोंदी दाखवून कोट्यवधी रुपयांची बिले लाटली, नागवडेंवर गंभीर आरोप


बोगस ऊसाच्या नोंदी दाखवून कोट्यवधी रुपयांची बिले लाटली, नागवडेंवर गंभीर आरोप



नगर:  नागवडे सहकार साखर कारखान्यात ज्यांना शेत जमीन नाही, शेतात ऊस नाही, उसाची नोंद नसताना देखील कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांच्या तसेच नातेवाईक आणि कर्मचारी यांच्या नावाने बोगस ऊसाच्या नोंदी दाखवून कोट्यवधी रुपयांची उसाची बिले काढली असल्याचा आरोप कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी लेखी पुरावे देत पत्रकार परिषदेत केला.

श्रीगोंदा येथील कुकडी शासकीय विश्राम गृह याठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, काँगेसचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील भोसले, जिजाबापू शिंदे, संजय जामदार, प्रशांत दरेकर, अजित जामदार, अ‍ॅड.बाळासाहेब काकडे, अ‍ॅड.बापूसाहेब भोस, अनिल ठवाळ हे उपस्थित होते.

यावेळी मगर यांनी सांगितले की राजेंद्र नागवडे हे सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या उसाच्या वजनात काटा मारून नुकसान केले तर स्वतः बोगस शेकडो टन उसाचे कोट्यवधी रुपयांची बिले कारखान्यातून काढली हे पैसे गेले कोठे याचा हिशेब नागवडे यांनी सभासदांना द्यावा असे सांगून त्यांनी पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले.तसेच नागवडे यांनी रॉ शुगर तसेच व्हाईट शुगर विक्रीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून सर्वसामान्य सभासदांचे प्रपंच उद्ध्वस्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post