भाजप खासदाराला भर रस्त्यात पाठलाग करून मारहाण..कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे कृत्य...

भाजप खासदाराला भर रस्त्यात पाठलाग करून मारहाण..कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे कृत्य... प्रतापगड: उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूरमधील एका कार्यक्रमावेळी भाजपचे खासदार संगमलाल गुप्ता यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी  गुप्ता यांचा पाठलाग करत त्यांना प्रचंड मारहाण केली.   पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे 

सांगापूर विकास खंड येथे एका आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खासदारल संगमलाल गुप्ता उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी आणि आमदार आराधना मिश्रही उपस्थित होते. मात्र, यावेळी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या कार्यक्रमाला काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.   या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पाठलाग करून मारहाण केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post