धनश्रीताई विखे पाटील यांच्याकडून महिलांना यशस्वितेचा कानमंत्र

 महीलांच्या दृष्टीने 'जागर जाणिवांचा, जागर अस्तित्वाचा' ही व्याख्यानमाला  उपयुक्त : सौ.धनश्रीताई विखे पाटीललोणी :.  महिलांच्या  दृष्टीने जागर जाणिवांचा, जागर अस्तित्वाचा ही व्याख्यानमाला सर्वाना उपयुक्त ठरले. कोरोना काळात सर्वानी विशेष काळजी घ्यावी  असे  प्रतिपादन रणरागिनी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील  यांनी केले.

      लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीच्या गृहविज्ञान आणि संगणक महीला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झालीत या निमित्त आयोजित जागर जाणिवांचा जागर अस्तित्वाचा या विषयावरीन तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या शुभारंभ प्रसंगी सौ.धनश्रीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी माजी प्राचार्या सौ. लिलावती सरोदे, गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. रुपाली नवले, प्रा. डॉ. कांचन देशमुख आदी उपस्थित होत्या. 

     आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या की,महीलांमध्ये  मोठी जिद्द असते. व्यवसाय आणि उद्योग यांची ती सांगड घालते. त्यांना जागर जाणिवांचा, जागर अस्तित्वाचा या विषयावर होणारे दिन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमाला महीलांसाठी महत्वपूर्ण ठरेल. यामधे सर्वांनी सहभाग घ्यावा असे सांगितले.

    व्याख्यानमालेतील स्वातंञ्य चळवळीत महीलांचे योगदान याविषयांवर माजी प्राचार्या लिलावती सरोदे म्हणाल्या की,स्वातंञ्यपुर्व काळतील देशहितासाठी योगदान देणा-या क्रांतीकारी महीलांचा इतिहास समजून सांगतानाच महीलांनी देखिल स्वातंञ्य प्राप्तीसाठी मोठे योगदान दिले पण त्याचा इतिहास आणि कार्य दुर्लक्षित आहे अशी खंत व्यक्त केली.

    तीन दिवसीय व्याख्यानमालेत २३ सप्टेंबर २०२१रोजी जेष्ठ पत्रकार सतीष वैजापूरकर यांचे स्वातं त्योत्तर काळात स्त्रियांची भूमिका यांवर तर २४ सप्टेंबर २०२१ रोजी एकल महाराष्ट्र राज्य महीला पुनर्वसन समितीच्या संगिता मालकर या कोरोना महामारीतील एकल महीलांच्या समस्या यावर व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या अनुश्री खैरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा रूपाली नवले, आभार डॉ कांचन देशमुख यांनी केले.

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post