दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा हल्ला, तिघे युवक जखमी

 दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा हल्ला, तिघे युवक जखमीनगर: कोल्हार लोणी रस्त्यावर  घोगरे मळा येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने तीन दुचाकीस्वारांवर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. सदर घटना रात्री सातचे दरम्यान लोणी  येथे घडली.

नितीन मुरलीधर गायकवाड (वय 37), अमोल विकास उनवणे (वय 34) दोघे रा. कोल्हार, स्वामी साहेबराव जाधव, रा. सोनगांव असे बिबट्याच्या हल्ल्यात  जखमी झालेल्यांची नांवे आहेत. जखमींनी दिलेल्या माहितीनुसार वरील तिघेही कोल्हार येथून आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्याचे घरी दुचाकीवरून जात होते.

लोणी येथील प्रवरा पब्लिक स्कुल जवळील घोगरे यांच्या पेरूच्या बागेजवळ येताच बांधावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने  प्रथम नितीन गायकवाड व अमोल उनवणे या दोघांवर हल्ला केला. यामध्ये नितीन याच्या पायाला मोठी जखम झाली तर अमोल यासही पायावर खोलवर दात लागले. दोघांनी प्रसंगावधान राखत बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका केली. मात्र मागे दुसर्‍या दुचाकीवरून येणार्‍या त्यांच्या जाधव या मित्रास बिबट्याने लक्ष केले. त्यालाही किरकोळ जखम झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post