'शांताबाई' फेम गायक कलाकार बांधणार राष्ट्रवादीचे 'घड्याळ'

 'शांताबाई' फेम संजय लोंढे बांधणार राष्ट्रवादीचे 'घड्याळ'पुणे : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या पाठोपाठ लोककलावंत गायक शांताबाई फेम संजय लोंढे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 16 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर कलाकारांचं इनकमिंग सुरु होणार असल्याची चर्चा आहे.

शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार करणार आहेत. येत्या 16 तारखेला मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार कलाकारांकरिता काम करण्याची इच्छा संजय लोंढे यांनी बोलून दाखवली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post