शिवसैनिकांनी पक्षाच्याच राज्यमंत्र्यांवर भर रस्त्यात व्यक्त केला रोष....नगर जिल्ह्यातील प्रकार

शिवसैनिकांनी पक्षाच्याच  राज्यमंत्र्यांचा ताफा अठवून विचारला जाब....नगर जिल्ह्यातील प्रकारनगर: जिल्हा परिषदेचा कार्यक्रमासाठी नगर जिल्ह्यात आलेले शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोल्हार मध्ये शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.  निमंत्रण पत्रिकेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचा फोटो नाही तसेच शिवसेनेचे मंत्री  कोल्हार येथे येत असताना स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतलेे नाही, त्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनाचा ताफा अडविला.

ना. अब्दुल सत्तार  यांनी कोल्हार भगवतीपूरमध्ये प्रवेश करताच कमानीजवळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे, तालुकाप्रमुख संजय शिंदे  तसेच शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविला. प्रथमतः त्यांचा सत्कार केला. त्यानंतर जिल्हा परिषदेचा कार्यक्रम असतानाही निमंत्रण पत्रिकेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो नाही तसेच शिवसेनेचे मंत्री येथे येत असतानादेखील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, स्थानिक पदाधिकारी यांना कोणतीही माहिती नाही. शिवसैनिकांना विश्वासात घेतले गेले नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली.

भविष्यात जिल्ह्यामध्ये कार्यक्रम असल्यास शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले जाईल असे सांगून ना. सत्तार यांनी यावेळी दिलगिरी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post