मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने *बेस्ट खड्डा स्पर्धा*

 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना  नगरच्या वतीने भव्य खड्डे फोटो स्पर्धा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने मध्ये *बेस्ट खड्डा स्पर्धा* जाहीर करण्यात आली आहे . शहरातील रस्त्यांची झालेली चाळण आणि त्यावर प्रशासन आणि लोकप्रतिनीधींची होत असली डोळेझाक लक्षात घेता याचा जाहीर निषेध करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.  विद्रूप , खोल ,जिवघेणा ,आकर्षित अशा खड्यांच्या फोटोला योग्य असे बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ अंबिकानगर महानगरपालिका येथे आयोजित करण्यात येणार आहे आणि *सन्माननीय, वंदनीय, पुजनीय , कार्यसम्राट , कर्तुत्ववान , किर्तीवान आयुक्त साहेबांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील*.तरी सर्व नगरकरांनी आपापल्या भागातील चौकातील गल्लीतील सुदंर अशा वेदनादायक जीवघेण्या अशा लोकप्रतिनिधींना आवडणाऱ्या खड्यंचे जास्तीत जास्त फोटो काढून या *९६५७४५७६६१* क्रमांकावर व्हॉट्स ॲप वर पाठवून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन...


सुमित संतोष वर्मा

जिल्हाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

अंबिकानगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post