केडगाव‌मध्ये आईवडीलांची लेकीसह आत्महत्या.... समोर येतंय 'हे' गंभीर कारण...

 

केडगाव‌मध्ये आईवडीलांची लेकीसह आत्महत्या.... समोर येतंय 'हे' गंभीर कारण...नगर : केडगाव येथील एकाच कुटुंबातील पती-पत्नीने दहा वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. कर्जाला कंटाळून कुटुंबाने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे.


संदीप दिनकर फाटक (वय 45), किरण संदीप फाटक (वय 32) आणि मैथिली संदीप फाटक (वय 10) अशी आत्महत्या केलेल्या तीघांची नावे आहे. फाटक कुटुंब केडगाव येथील अथर्वनगर परिसरात भाड्याने राहत होते.

संदीप फाटक हे व्यावसायिक आहेत. त्यांचे किराणा मालाची केडगाव येथे एजन्सी आहे. त्यांची पत्नी किरण या गृहिणी तर मुलगी मैथिली शिक्षण घेत होती. संदीप यांनी विविध माध्यमातून सुमारे दीड कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्याच कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी कुटुंबियांसह आत्महत्या केली आहे. फाटक यांनी लिहून  ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये हे सर्व नमूद करण्यात आले असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. तसेच कर्जामुळे ते तणावाखाली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post