जायकवाडीत 60 टक्के उपयुक्त पाणीसाठा ! नगर जिल्ह्याची चिंता मिटणार

 जायकवाडीत 60 टक्के उपयुक्त पाणीसाठा ! नगर जिल्ह्याची चिंता मिटणारनगर: जायकवाडी धरणात  काल सायंकाळी 6 वाजता 45.85 टिएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. हे धरण 59.79 टक्के भरले आहे. तर याच वेळी 32 हजार 500 क्युसेक ने पाण्याची आवक होत होती. पाण्याची आवक पाहता आज सायंकाळी अथवा उद्या सायंकाळ पर्यंत जायकवाडीचा उपयुक्त साठा 50 टिएमसी पर्यंत म्हणजेच 65 टक्के पर्यंत पोहचेल असा अंदाज आहे. हे नगर तसेच नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. साठा 50 टिएमसी झाल्यानंतर जायकवाडीला या दोन्ही जिल्ह्यातील धरणांमधुन कायदेशीररित्या पाणी सोडण्याची गरज पडणार नाही. नगर जिल्ह्यातील भंडारदरा- निळवंडेतुनही विसर्ग सुरु झाला आहे. तोही उद्या पर्यंत जायकवाडीच्या बॅक वॉटर असलेल्या प्रवरासंगम येथे दाखल होईल. गोदावरीतुन विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गंगापूर, वैजापूर भागातील छोट्या मोठ्या नद्या, ओढे हेही गोदावरीत विसावत आहेत. त्यामुळे जायकवाडीचा साठा बर्‍या पैकी वाढू शकेल असा अंदाज आहे.समन्यायीच्या धोरणानुसार 65 टक्के उपयुक्तसाठा होण्यास अवघे काही तास बाकी आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post