भारताची इंग्लंडवर मात, मालिकेत २-१ आघाडी

 

भारताची इंग्लंडवर मात, मालिकेत २-१ आघाडी ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपवला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. ही आघाडी फोडत भारताने दुसऱ्या डावात 466 धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला 368 धावांचं आव्हान दिलं. भारताने दिलेलं हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवलं नाही. इंग्लंडचा संघ 210 धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे भारताने या सामन्यात इंग्लंडवर 157 धावांनी मात करत मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post