५० हजारांची ऑनलाईन लाच, तहसीलदारांच्या तक्रारीनंतर दोघांना अटक

 वाळू वाहतूक ट्रक सोडण्यासाठी ५० हजारांची ऑनलाईन लाच, तहसीलदारांच्या तक्रारीनंतर दोघांना अटकपुणे: हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना बळजबरीने लाच देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्याने ट्रक सोडण्यासाठी हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या वैयक्तिक बचत खात्यावर गुगल पे च्या माध्यमातून 50 हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर तृप्ती कोलते यांनी खडक पोलीस स्टेशन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.


या तक्रारीच्या आधारे दत्तात्रय हिरामण पिंगळे ( वय 33, रा.देऊळगावगाडा, ता. दौंड जिल्हा पुणे) आणि अमित नवनाथ कांदे (वय 29, कमलविहार गोपाळपट्टी मांजरी बुद्रूक, ता.हवेली जिल्हा पुणे) या दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या खडक पोलीस या प्रकरणाला पुढील तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post