गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर....

 

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर....मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 

विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गुजराजच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीच चार नावं घेतली जात आहेत. त्यामुळे प्रामुख्याने नितीन पटेल, चंद्रकांत रघुनाथ पाटील, मनसुख मांडवीय आणि गोवर्धन जफादीया यांची नावं चर्चेत आहेत.

गुजराज भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील अर्थात चंद्रकांत रघुनाथ पाटील यांचंही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. भाजपने गुजराजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाटील यांच्या नेृत्वातच लढवल्या होत्या. असं असलं तरी गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं वर्चस्व आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये किती काळापर्यंत टिकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post