४ ऑक्टोबर पासून कोणते वर्ग भरणार ?, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती मुंबई: टास्क फोर्सनं शिक्षक आणि पालक यांच्या बैठकीत काय चर्चा करायची यासंदर्भात माहिती दिली आहे. पालकांची संमती असणं गरजेचं आहे. फिजिकल डिस्टन्सिगं याचं पालन करण्यासंदर्भात सूचना देण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही 4 ऑक्टोबरला शाळा सुरु करत आहोत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

टास्क फोर्सकडून नव्या सूचना मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्यास सक्ती नसेल. ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सनं दिलेल्या सूचना शाळांच्या मुख्याध्यापकांना कळवल्या जातील. टास्क फोर्सच्या सूचना आणि शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचना लवकरचं विद्यार्थी पालक आणि शाळांना कळवली जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post