FB वरील मैत्री... मुलगी असल्याचे भासवून डॉक्टरला २ कोटींना गंडवले....

 सोशल मीडियावर मुलगी बनून दिल्लीच्या डॉक्टरला २ कोटींना गंडवले.... पोलिसांनी केला पर्दाफाशयवतमाळ: सोशल मीडियाच्या माध्यमातून यवतमाळ येथील एका तरुणीने दिल्ली येथील नामांकीत डॉक्टरासोबत मैत्री पूर्ण संबंध प्रस्थापित केले. त्यांच्याकडून दोन कोटी रोख रक्‍कम, मौल्यवान दागिन्यांची भेट स्विकारली आणि त्यांनतर अकाऊंट अचानक बंद केल्याने स्वता:ची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्या डॉक्टराने थेट यवतमाळ गाठत पोलीस अधिक्षक कार्यालत येऊन आपली आपबीती सांगितली. 

त्या अनुषंगाने सायबर सेलच्या पथकाने फसवणूक करणारे महिलेची माहिती घेवून तांत्रिक विश्लेषण केले असता डॉक्टरची फसवणूक करणारी महिला नसून तो पुरुष असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक गठीत करुन स्थानिकांनी अरुणोदय सोसायटीतील एका घरी भाड्याने राहणाऱ्या इसमाच्या घरी धाड टाकली असता सदर ठिकाणी आरोपी संदेश अनिल मानकरकडून एक कोटी 72 लाख 7 हजार रुपये नगदी व चार लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि  चार विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण 1 कोटी 78 लाख 6 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात यवतमाळ पोलिसांना यश आलं. या प्रकरणातील आरोपी ची चौकशी सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post