'गोव्यात फक्त पर्यटन, मी पुन्हा येईन', राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला

 

'गोव्यात फक्त पर्यटन, मी पुन्हा येईन', राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोलामुंबई : गोव्याच्या बीचवर पर्यटकाच्या वेशभूषेत ‘मी पुन्हा येईन’ असा महाराष्ट्राला दिलेला गर्भित इशाऱ्याचा फलक घेऊन उभे असलेले देवेंद्र फडणवीस गोव्यात ‘फक्त पर्यटन’ करुन परतणार अशा आशयाचे व्यंगचित्र काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. 

 भाजपने गोवा निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. मात्र गोव्यापेक्षा महाराष्ट्रात सत्ता आली तर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची फडणवीस यांची सुप्त इच्छा आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची सत्ता फडणवीस आणतील का याबाबत क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून प्रश्नचिन्ह उभे केले आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post