कॉंग्रेसची धाकधूक वाढली..विचार करुनच राज्यसभेसाठी भाजप रिंगणात, फडणवीस यांचे सूचक वक्तव्य....

 विचार करुनच राज्यसभेसाठी भाजप रिंगणात, फडणवीस यांचे सूचक वक्तव्य....मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून रजनी पाटील यांचा  अर्ज आज दाखल केला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण भाजप नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलंय. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 

‘आमच्या पक्षात कुठलाही निर्णय मी एकटा करत नाही. पक्षाच्या कोअर कमिटीशी मी चर्चा करेल आणि त्या आधारावरच निर्णय होऊ शकतील. आता तरी कोअर कमिटीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आम्ही फॉर्म भरल्याचं फडणवीस म्हणाले. दरम्यान, भाजपचं संख्याबळ नाही, त्यामुळे त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येतेय. त्याबाबत विचारलं असता निवडणूक बिनविरोध व्हायची असेल तर त्यांनी त्यासाठी नक्की प्रयत्न करावा. आम्हाला प्रतिप्रश्न करुन निवडणूक कशी बिनविरोध होईल? भारतीय जनता पक्षाने काही विचार करुनच फॉर्म भरला असेल. समजा उद्या नाही लढवायची असंही कोअर कमिटीच ठरवेल’, असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post