आजोबांच्या शब्दाला आ.रोहित पवारांकडून कवडी किंमत, करोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा.... Video

 प्रतिनिधी जामखेड              ।       ( नासीर पठाण )


*आजोबांच्या शब्दाची कवडी किंमत करणाऱ्या नातू रोहित पवार विरोधात करोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा-राम शिंदे*जामखेड -मी मंजूर केलेली जामखेड ची नळ पाणीपुरवठा योजना जाणीव पूर्वक दोन वर्षे प्रलंबित ठेवून जनतेला स्वच्छ पाण्या पासून वंचित ठेवले केवळ स्वतःला श्रेय घेण्यासाठी तसेच आम्ही मंजूर केलेल्या कांमाचे भुमिपूजन करून आ रोहित पवार हे दिंडोरा पिटवुन स्वत च आपल्या स्वागताचे फलक लावून प्रसिद्धी मिळवत आहेत कोणी योजना मंजूर केली हे जनता विसरणार नाही येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा आरोप माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी आ रोहित पवार यांच्या वर पञकार परिषदेत केला

जामखेड शहर व नगरपरिषद हद्दीतील वाड्यांसाठी आ रोहित पवार यांनी १३८.८४ कोटींची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले यावरून राजकीय श्रेय वादाची लढाई सुरू झाली या बाबत माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दि ९ रोजी पत्रकार परिषद घेऊन ही योजना मी मंजूर केली आहे असे सांगितले या पञकार परिषदेत भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले जिल्हा सरचिटणीस मनेश मासाळ जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात माजी सभापती भगवान मुरुमकर पंचायत समितीचे उपसभापती रवी सुरवसे डॉ ज्ञानेश्वर झेंडे बिभीषण धनवडे सोमनाथ राळेभात अमित चिंतामणी पांडुरंग उबाळे सलिम बागवान अभिजीत राळेभात प्रविण सानप प्रविण चोरडीया सरपंच बापुराव ढवळे केशव वनवे अनिल शेळके यासह पदाधिकारी उपस्थित होते


      यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की जामखेड ची नळ पाणीपुरवठा योजना तत्कालीन सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी मंजूर करून आणली परंतु आ रोहित पवार यांनी आपल्याला श्रेय घेण्यासाठी ही योजना दोन वर्षे प्रलंबित ठेवून दोन दिवसापूर्वी ही योजना मंजूर करून मी आणली असे फलक आ रोहित पवार यांनी स्वत लावून प्रसिद्धी मिळवली आहे यावर आरोप करताना शिंदे यांनी सांगितले की या योजनेसाठी मी अहोरात्र प्रयत्न करत जनतेने दिलेल्या मंत्रीपदाच उउपयोग जनतेच्या हितासाठी केला तसेच मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर निधी मंजूर केला याचे उद्घाटन आ पवार करत आहेत भुलथापा मारून जनतेला फसवत आहेत जलयुक्त शिवार च्या माध्यमातून मतदारसंघात सिमेंट बंधारे बांधण्यात आली त्यामुळे तालुका टँकर मुक्त झाला तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे याकडे आमदार लक्ष देत नाही फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी फेसबुक हाँटसाँप सोशल मीडिया माध्यमातून खोटे बोलत आहे खर्डा किल्ल्या साठी आम्ही चार कोटी निधी मंजूर करून किल्लाचे काम केले पंरतु जी अर्धवट कामासाठी त्यांनी निधी आणावा भगवा झेंडा हे हिंदुत्वाचे प्रतीक आहे आम्ही कधीच झेंडा मिरवत फिरलो नाही कजँत येथील गोदड महारांच्या पालखी समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश पायदळी तुडवत,आजोबा च्या शब्दाची कवडी किंमत करणाऱ्या नातू आ रोहित पवार विरोधात करोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करा.

    दोन वर्षापासून निवडणूक झाल्यानंतर पक्षातील लोकांना ते किंमत देत नाही उलट आमच्या पक्षातील पदाधिकारी यांना अडचणीत आणुन उद्योग धंद्यावर बोट ठेवून अडचणी निर्माण करत जबरदस्तीने प्रवेश करून घेत आहेत

राज्यातील महाविकास आघाडी सरकार वर बोलताना शिंदे म्हणाले की हे सरकार तालीबानी आहे हे सरकार शेवटची घटका मोजत आहे ओबीसीना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणूका होणार नाही असे शिंदे यांनी सांगितले .

Video
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post