सराईत चोराकडून साडे आठ लाखांच्या दुचाकी हस्तगत


सराईत चोराकडून साडे आठ लाखांच्या दुचाकी हस्तगत नगर: श्रीरामपूर तालुका पोलिसांनी सापळा रचून सराईत मोटारसायकल चोरास अटक केली. त्याच्याकडून 8 लाख 30 हजार रुपये किमतीची 12 दुचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. दत्तू सावळेराव पवार (वय 29, रा. रांजणगाव, ता. राहाता) असे अटक केलेल्या मोटारसायकल चोराचे नाव आहे.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके  यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे  यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सवानिमित्त विशेष मोहीम राबविण्यात आली असून या अंतर्गत तसेच पोलीस निरीक्षक साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रांजणगाव येथे सापळा रचून दत्तू सावळेराव पवार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून बजाज कंपनीच्या 3, हिरो होंडा कंपनीच्या 8, टिव्हीएस स्टार कंपनीची 1, अशा एकूण 8 लाख 30 हजार रुपये किमतीची 12 दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. दत्तू पवार याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक आढागळे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post