कॉंग्रेस आमदारावर सुनेने केले गंभीर आरोप, एक कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार

 

कॉंग्रेस आमदारावर सुनेने केले गंभीर आरोप, एक कोटींची खंडणी मागितल्याची तक्रारसातारा : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी आणि काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील यांच्या सून आदिती पाटील यांना सासरच्या लोकांकडून शिवीगाळ, मारहाण आणि खंडणी मागितल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

आदिती पाटील यांनी सासरे पी.एन.पाटील आणि त्यांचा मुलगा  राजेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सासरच्या लोकांकडून शिवीगाळ, मारहाण आणि खंडणी मागितल्याचा आरोप आदिती पाटील यांनी केला आहे. याबद्दल तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

त्यानुसार कराड शहर पोलिसांनी काँग्रेसचे आमदार.पी.एन पाटील यांच्यासह मुलगा राजेश आणि टिना पाटील यांच्यावर एक कोटींची खंडणी आणि मानसिक, शारीरिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post