मोठी बातमी...करोना मयतांच्या कुटुंबियांना ५० हजारांची मदत...केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

 

मोठी बातमी...करोना मयतांच्या कुटुंबियांना ५० हजारांची मदत...केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रनवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून ही मदत दिली जाईल, असंही केंद्र सरकारने कोर्टात सांगितलं. देशात आतापर्यंत तब्बल 4 लाख 46 हजार कोरोनाचे बळी गेले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये देण्याची शिफारस केली होती. याचसंबंधी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. इथून पुढच्या काळामध्ये ज्यांना कोरोना संसर्गाने मृत्यू होईल, त्यांच्या कुटुंबीयांना ही मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने कोर्टात दिली

मदतीची रक्कम मिळविण्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी छापील अर्ज किंवा हॉस्पिटलच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आपत्ती निवारण निधी अधिकारी किंवा त्यांच्या कार्लालयात अर्ज सादर करावा लागेल.

या अर्जावर संबंधित यंत्रणेला 30 दिवसांत निर्णय घ्यावा लागेल

मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल

अर्जावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती असणार

समितीला जर अर्ज फेटाळायचा असेल तर त्याचे लेखी कारण देणं बंधनकारक

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post