महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉंग्रेस पदाधिकार्यांना नियुक्ती पत्रे प्रदान

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉंग्रेस पदाधिकार्यांना नियुक्ती पत्रे प्रदाननगर:  अहमदनगर जिल्हा काँग्रेस अंतर्गत अहमदनगर जिल्हा किसान काँग्रेस विभागाचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब व आमदार लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

अहमदनगर जिल्हा किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विक्रम नवले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

किसान काँग्रेस च्यावतीने जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली. या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिप चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, कार्याध्यक्ष व साई संस्थानचे नवनियुक्त विश्वस्त सचिन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा सरचिटणीस शिवाजी नेहे,  शहराध्यक्ष किरण काळे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे, किसान सेल जिल्हा निरीक्षक इंद्रभान थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे,  दिपक पाटील भोसले, शहाजीराजे भोसले, प्रविणदादा घुले, संजय पोटे, शंकरराव देशमुख, अंकुश शेळके, अरुण पाटील नाईक, समिन बागवान,  किरण पाटील, नासीर शेख, संभाजीराव रोहकले, निजाम जहागीरदार, शंकरराव वाळुंज, संभाजीराव वाकचौरे, राहुल उगले, अशोकराव राक्षे, प्रकाश देशमुख, सुजीत नवले, साईनाथ नवले, मनोज गुंदेचा, विशाल कळमकर, भूषण शेळके, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष योगेश दिवाणे, विधानसभा अध्यक्ष सौरभ रणदिवे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post