छिंदम बंधूंच्या पोलिस कोठडीत वाढ...जातीवाचक शिविगाळ प्रकरण

 छिंदम बंधूंच्या पोलिस कोठडीत वाढ...जातीवाचक शिविगाळ प्रकरणनगर: ज्युस दुकानदाराला जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर  करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांच्या पोलीस कोठडीत 24 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे करीत आहे.

नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात मागील महिन्यामध्ये एका गाळेधारकाला दमदाटी करून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार छिंदम व त्याच्या साथीदाराने केला होता. या प्रकरणी भगिरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल आहे. छिंदम बंधूंसह चारही जणांनी औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

त्यापैकी छिंदम बंधूंचे जामीन अर्ज न्यायालयाने  फेटाळले होते. दरम्यान उपअधीक्षक ढुमे यांच्या पथकाने छिंदम बंधूंना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता त्यांच्या कोठडीत 24 सप्टेंबरपर्यंत वाढ झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post