ऑनलाइन शिक्षण ही तात्पुरती व्यवस्था...प्रत्यक्ष शिक्षणाचं महत्त्व कायम....

 शिक्षक दिना निमित्त चिचोंडी पाटील ग्रामपंचायती तर्फे आजी-माजी शिक्षकांचा सन्मान     नगर:   ऑनलाइन शिक्षण केवळ तात्पुरती पर्यायी व्यवस्था आहे शिक्षक व शिक्षकाचे महत्त्व कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होऊ शकत नाही त्यामुळे कितीही आधुनिक तंत्रज्ञान आले तरी प्रत्यक्ष शिक्षणाचे महत्त्व कायम राहील असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांनी केले.

      ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांतर्फे शिक्षक दिनाच्या औचित्य साधून चिचोंडी पाटील गावातील आजी-माजी शिक्षकांचा सन्मान समारंभाचा अनोखा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

            ज्येष्ठ शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी संचालक कल्याण ठोंबरे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन डॉ. ययाती फिसके , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाजीराव हजारे सरपंच मनोज कोकाटे उपसरपंच कल्पना ठोंबरे , माजी सरपंच अर्चना चौधरी, ग्रामपंचायत सदस्य दीपक हजारे, संदीप काळे, वैभव कोकाटे, भाऊसाहेब बेल्हेकर, राजश्री कोकाटे, दत्तु धुळे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राजेंद्र कोकाटे , विद्यमान अध्यक्ष आर एम कोकाटे, माजी उपसरपंच पांडुरंग ससे, महेश जगताप, संदीप सुरवसे, लोकमान्य पतसंस्थेचे चेअरमन अरूण दवणे, आनंदा मुटकुळे, भाऊसाहेब हजारे, गंगा कोकाटे, भाऊसाहेब ठोंबरे आदी मंचावर उपस्थित होते.

             डॉ कळमकर पुढे म्हणाले की, शिक्षक कोणतेही काम अतिशय प्रामाणिकपणे करत असतो शिक्षक महसूल विभागाचे कामे सांभाळू शकतो पोलीस खात्याची कामे करू शकतो याशिवाय जी कुठली जबाबदारी शिक्षकांवर सोपवली जातील त्या सर्व जबाबदाऱ्या सक्षम पणे पार पाडत असतो . परंतु शिक्षकाचे ज्ञानदानाचे काम मात्र केवळ शिक्षक आणि शिक्षकच करू शकतो ही जबाबदारी अन्य कोणताही घटक पेलू शकत नाही. विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी ही केवळ शिक्षकांची नसून मूल्य शिक्षणासाठी त्यांच्या घरातील वातावरण सर्वात अधिक कारणीभूत ठरत असते.

                कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णम आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

                यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंचक्रोशीतील सर्व आजी-माजी शिक्षकांना प्रशस्तीपत्रक व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

                 सत्काराला उत्तर देत महादेव भद्रे, सुहास ठिपसे ,भाऊसाहेब काळदाते, मुस्तफा मणियार, बाबासाहेब वाडेकर ,अजय भद्रे प्रा. विजय कोकाटे, प्रा संजय ठोंबरे ,शरद धलपे ,राजश्री भद्रे मंगल अष्टेकर , मुख्याध्यापिका भुजबळ मॅडम, केंद्र प्रमुख राजेंद्र खडके, माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या माजी संचालक कल्याण ठोंबरे आदीं शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

         कामधेनु पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ ययाति फिसके यांनी आजच्या शिक्षण पद्धतीच्या झालेल्या ऱ्हासाचे कारण आधुनिक काळात झालेले अनावश्यक शैक्षणिक बदल असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे लवकरात लवकर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचं स्पष्ट केलं.

      ज्येष्ठ शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे यांचे अध्यक्षीय भाषण झाले.

      यावेळी श्रीरंग कोकाटे, साहेबराव कोकाटे, सुदाम करांडे, दिनकर भोस , धर्माजी हजारे , सहादु खांदवे, गंगाधर देवकर, भागचंद कोकाटे , महादेव कांबळे, अब्बास पठाण, प्रा बबन शिंदे आदी जेष्ठ शिक्षक उपस्थित होते .

       कार्यक्रम यशस्वीते साठी ग्रामसेवक देवीदास मोरे, विष्णू भद्रे, चंद्रभान पवार, राजु तनपुरे, संजय गाडे, जितु गाडे, बाळासाहेब बोरुडे आदी नी विशेष परिश्रम घेतले .

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रकाश ठोंबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य जयश्री कोकाटे यांनी केले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post