भाजपसारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार


भाजपसारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार पुणे -पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचेआमदार सुनील कांबळे यांची पुणे महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुन, रुपाली चाकणकर यांनी भाजपा आणि आमदार सुनिल कांबळेवर निशाणा साधला आहे. तसेच, सुनिल कांबळेंनी संबंधित महिला कर्मचाऱ्याची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केलीय. 

'आमदार सुनील कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे. महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे. भाजपसारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार', असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी भाजपवर बोचरी टीका केलीय. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य केलंय.  0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post