चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा, अजितदादा यांच्याकडे मागणी

 

चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा, अजितदादा यांच्याकडे मागणीमुंबई :  राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. चंद्रकांतदादांमुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे. त्यांच्यावर अजितदादांनी करमणूक कर लावावा, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलं. त्यानंतर चाकणकरांनी चंद्रकातदादांची खिल्ली उडवली.

चंद्रकांतदादांची खिल्ली उडवणारं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. 

रुपाली चाकणकर म्हणाल्या, “चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post