हवं त्याला मुख्यमंत्री करा... कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला राजीनामा


हवं त्याला मुख्यमंत्री करा... कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला राजीनामा नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली धुसपूस आज वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे.  पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदस सिंग  यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा  दिलाय. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. 

‘दोन महिन्यात काँग्रेस आमदारांची दिल्लीत तिसऱ्यांदा बैठक बोलावण्यात आली आहे. याचा अर्थ असा की आता माझ्यावर विश्वास राहिला नाही किंवा मी सरकार चालवू शकलो नाही. मात्र, यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आता हवं त्याला मुख्यमंत्री करा’, अशी संतप्त प्रतिक्रिया कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post