५० हजारांची लाच, नगर जिल्ह्यातील पोलिस हवालदार 'एसीबी'च्या जाळ्यात


५० हजारांची लाच, नगर जिल्ह्यातील पोलिस हवालदार 'एसीबी'च्या जाळ्यातनगर: तक्रारदार यांना  मिसींग मध्ये मदत करुन मिसिंग प्रकरण बंद करणेसाठी ५०,०००/- ची मागणी केली. तक्रारदार यांनी ला. प्र.विभागाकडे दि १७/०९/२०२१ रोजी दिलेल्या तक्रारीवरून त्याच दिवशी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपींनी  पोलीस स्टेशन बेलवंडी, येथे पंचासमक्ष तक्रारदार यांचे कडे ₹ ५०,०००/- ची मागणी करून तडजोड अंती ₹ २२ हजार रूपयांची  लाचेची रक्कम स्विकारण्याची संमती दर्शवली.  याप्रकरणी आरोपी प्रकाश आसाराम बारवकर, (वय ५६ वर्ष, धंदा - नौकरी, पोलीस हवालदार, बक्कल नंबर - ४२८,  नेमणूक  बेलवंडी पोलीस स्टेशन, ता- श्रीगोंदा, जि. अहमदनगर, वर्ग ३.

रा- दातीर- लबडे वस्ती, बेलवंडी, ता- श्रीगोंदा, जिल्हा- अहमदनगर) विरूद्ध बेलवंडी पोलीस स्टेशनला गुन्हा गुन्हा दाखल केला आहे . आरोपी लोकसेवक याला ताब्यात घेतले आहे.


*सापळा अधिकारी*:-. हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक,  ला.प्र. वि. अहमदनगर

▶ **सापळा पथक:-** पुष्पा निमसे, पोलीस निरीक्षक,  पो हवा. संतोष शिंदे, पो ना.रमेश चौधरी, विजय गंगुल,  पो अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड , चालक पोलीस हवालदार हारुन शेख, पोलीस नाईक- राहुल डोळसे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post