'या' कारणासाठी मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी...

 मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी...रायपूर: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना ब्राह्मण समाजाविरोधात विधान करणं चांगलच भोवलं आहे. नंदकुमार बघेल यांना 21 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बघेल यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायासाठी लढू असं विधान केलं आहे. 

ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्या केल्याबद्दल भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला होता. आज त्यांना रायपूरच्या एका न्यायालयासमोर आणण्यात आले. यावेळी मॅजिस्ट्रेट जनक कुमार हिडको यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यानंतर त्यांना 21 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोर्टाच्या या शिक्षनंतर नंदकुमार बघेल यांनी जामीन न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. मी जामीन घेणार नाही. सर्वोच्च न्यायालयापर्यंत मी न्यायासाठी लढेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post