महिला बालकल्याण सभापतीपदासाठी शिवसेना व कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच

 

महिला बालकल्याण सभापतीपदासाठी शिवसेना व कॉंग्रेसमध्ये रस्सीखेचनगर: महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या रिक्त 16 जागांवर महासभेव्दारे बुधवारी नव्याने सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे 6, शिवसेना 5, भारतीय जनता पक्ष 4, काँग्रेस व बसप प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी काँग्रेस इच्छुक असली, तरी शिवसेनेने या पदासाठी मोर्चेबांधणी केली आहे.

महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या महापालिकेतील शिवसेना महापौरांनी महाभेत ही समितीचे विसर्जित केली होती. त्यानंतर नव्या 16 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी बुधवारी दुपारी ऑनलाईनपध्दतीने महासभा झाली. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, नगर सचिव एस. बी. तडवी उपस्थित होते.

राष्ट्रवादी- मीना चोपडा, मीना चव्हाण, दीपाली बारस्कर, परवीन कुरेशी, शोभा बोरकर, शिवसेना- कमल सप्रे, पुष्पा बोरूडे, सुरेखा कदम, सुवर्णा गेनप्पा, शांताबाई शिंदे, भाजप- वंदना ताठे सोनाली चितळे, आशा कराळे, पल्लवी जाधव, काँग्रेस- सुप्रिया जाधव, बसप- अनिता पंजाबी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post