ऐन कार्यक्रमात मद्यपीचे आगमन, अजितदादा म्हणाले.... लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत...

 ऐन कार्यक्रमात मद्यपीचे आगमन, अजितदादा म्हणाले.... लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत...बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. मात्र आज त्यांच्याच कार्यक्रमात एका दारुड्यानं एन्ट्री केली. हे पाहून अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं. अजितदादांनी आपल्या भाषणात माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत. लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत.. असं म्हणत तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

बारामती तालुक्यातील कटफळ येथे ड्रोनद्वारे भूमापन सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी अजित पवार यांनी ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाची प्रत्यक्ष पाहणी करत प्रात्यक्षिकासह माहिती घेतली. या प्रात्यक्षिकावेळी एक दारुडा चक्क नमस्कार घालत अजितदादांच्या पुढे आला. त्यावर अजित पवार यांनी हा तर दुपारीच चंद्रावर गेलाय असं म्हणताच पोलिस त्याला बाजूला घेऊन गेले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post