ज्येष्ठ नेते पवार, गृहमंत्री वळसे-पाटील यांना अटक करण्याची मागणी

 

ज्येष्ठ नेते पवार, गृहमंत्री वळसे-पाटील यांना अटक करण्याची मागणीपुणे:  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या दोघांनी कोरोना नियम तोडत जुन्नर-आंबेगाव पुणे येथे गर्दी जमून ज्याप्रकारे सभा केली. त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल २१ इतरांच्या जीवनाचा अधिकार त्यावर गदा येते आणि इतर लोक ह्या मुळे संक्रमित होऊ शकतात. त्यामुळे ही गर्दी जमणाऱ्यांविरुद्ध म्हणजेच शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.  

सदावर्ते यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की,   शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाचे नियम नाहीत का? आणि कोव्हिडचे नियम तोडल्यामुळे पुण्यात भरभरून गर्दी करून लोकप्रतिमा तयार करून केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकांना एकत्र आणणे आणि इतर लोकांना वेठीस पकडणे हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल २१ ला हे अभिप्रेत नाही. शरद पवार कायद्यापेक्षा मोठे नाहीत. दिलीप वळसे पाटील तुम्ही मंत्री आहेत. परंतु तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही.  अटक जर नाही केली तर आम्ही या सर्व बाबी आम्ही कारवाई नाही झाली म्हणून, FIR नाही झाला म्हणून मुंबई उच्च न्यायालयासमोर आणि राज्यपालांसमोर ठेवू असही त्यांनी सांगितले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post