३.३९ कोटींची अनियमितता... जिल्हा बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना 'ईडी'चे समन्स

 

३.३९ कोटींची अनियमितता... जिल्हा बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना 'ईडी'चे समन्स



अमरावती:  अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक अनियमितता झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी ईडीने बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे अमरावती जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलु देशमुख व काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्नी माजी अध्यक्ष उत्तरा जगताप यांना  समन्स बजावले आहे. 

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता झाली होती. यानंतर ईडीने संपूर्ण व्यवहाराची माहिती मागवली असून जिल्हा उपनिबंधकाना ईडीने पत्र पाठवत मुंबई ईडी कार्यालयात बँकेचा लेखापरिक्षण अहवाल मागविले होते. अमरावती जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दलालीपोटी 3.39 कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देने बंधनकारक नव्हते, त्यामुळे बँकेची 3.39 कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी 15 जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलाल अशा एकूण 11 जणांवर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post