भीषण अपघात... जीप लॉरीला ध़डकल्याने 8 ठार

 भीषण अपघात... जीप लॉरीला ध़डकल्याने 8 ठारकर्नाटकमध्ये एका भीषण रस्ते अपघातात 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. चिंतामणी भागातील मरनायकनहळ्ळी हा अपघात झाला. जीप आणि लॉरीमध्ये टक्कर झाल्याने जीपमधील 8 जणांना जीव गमवावा लागला. चिक्कबळ्ळापूर पोलिसांनी याची माहिती दिली.  सात जण जखमी झाले आहेत. जीपमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसले होते. 2 मुलांसह 17 जण या जीपमधून प्रवास करत होते. हे सारे श्रीनिवासपुरा तालुक्याच्या रालपाडु येथून चिंतामणीला जात होते. रविवारी हा अपघात झाला. जीपमधून काही लोक हायवेवरून जात होते. तेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या लॉरीला जोरदार धडक बसली. यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post