‘लाल भेंडी’ करू शकते शेतकर्‍यांना मालामाल....एका किलोला मिळतात 800 रुपये

‘लाल भेंडी’ करू शकते शेतकर्‍यांना मालामाल....एका किलोला मिळतात 800 रुपये 



भोपाळ :    मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातील खजुरी कलान   येथील शेतकरी मिश्रीलाल राजपूत यांनी आपल्या शेतात लाल भेंडी लावली आहे, ज्याची किंमत 800 रुपये किलो आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, मिश्रीलाल राजपूत यांनी हेदेखील सांगितलं, की ही भेंडी इतकी महाग का आहे आणि याची खासियत काय  आहे.

सहसा भेंडीचा रंग हा हिरवा असतो मात्र या भेंडीचा रंग लाल आहे. ही हिरव्या भेंडीपेक्षा अधिक पौष्टिक आहे. ज्या लोकांना हृदयासंबंधीचे आजार किंवा ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांच्यासाठी ही भेंडी अतिशय आरोग्यदायी आहे. सोबतच ज्या लोकांना मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठीही ही उपयोगाची आणि फायद्याची आहे. भेंडीच्या उत्पादनाबद्दल बोलताना मिश्रीलाल यांनी सांगितलं, की मी वाराणसीच्या अॅग्रीकल्चर रिसर्च इन्सिट्यूटमधून 1 किलो भेंडीचं बीज विकत घेतलं होतं. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे बीज पेरलं. 40 दिवसांनंतर भेंडी यायला सुरुवात झाली. मिश्रीलाल यांनी सांगितलं, या भेंडीच्या शेतीत कोणतंही घातक किंवा हानिकारक किटकनाशक वापरलं गेलं नाही. त्यांनी सांगितलं, की एका एकरात कमीत कमी 40-50 क्विंटल आणि जास्तीत जास्त 70-80 क्विंटल भेंडीचं उत्पादन मिळतं. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post