ग्रामपंचायत कारभारात 8 लाखांचा अपहार... ग्रामसेवक निलंबित

ग्रामपंचायत कारभारात 8 लाखांचा अपहार... ग्रामसेवक निलंबित धुळे  : ग्रामपंचायत कारभारात आठ लाखांचा अपहार केल्याच्या संशयावरून चांदसे- चांदसूर्या (ता. शिरपूर) येथील ग्रामसेवक राजेंद्र सोनू महाले यांना निलंबित करण्याचे आदेश गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे यांनी दिले. महाले यांच्या कारभाराबाबत तक्रारी झाल्याने शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यात विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत महाले यांनी १५ व्या वित्त आयोगांतर्गत पीएफएमएस प्रणालीचा वापर न करता धनादेशाद्वारे तीन लाख ९२ हजार ६३६ रुपयांची देयके दिल्याचे आढळले. या रकमेचा भरणा करण्याचे आदेशही त्यांनी पाळले नाहीत.

ग्रामपंचायतीवर प्रशासक असताना त्यांना कोणतीही सूचना न देता त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा परस्पर वापर करून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून एकूण सात व्यवहारांपोटी चार लाख एक हजार ७०० रुपयांचा अपहार केला.  महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमाचा भंग केल्याने महाले यांना निलंबित करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post