अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची 52 वी वार्षिक सभा ऑनलाईन पध्दतीने खेळीमेळीत

  अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची 52 वी वार्षिक सभा ऑनलाईन पध्दतीने खेळीमेळीत15 टक्के लाभांशासह 1 कोटी रुपये सभासद खात्यात वर्ग : एकनाथ ढाकणे, दिवाळीत सभासदांना मिळणार गोड भेट


अहमदनगर : अहमदनगर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या सभेत सभासदांना 15 टक्के लाभांश व कायम ठेवीवर 9 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सभासदांच्या खात्यावर 1 कोटींची रक्कम जमा होणार आहे. तसेच येत्या दिवाळीत सभासदांना प्रत्येकी 15 किलो साखरेची गोड भेट देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष तथा पतसंस्थेचे मानद सचिव एकनाथ ढाकणे यांनी दिली.
ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सभेच्या कामकाजात संस्थेचे मानद सचिव एकनाथ ढाकणे, चेअरमन विजयकुमार बनाते, व्हा.चेअरमन शितल पेरणे-खाडे, संचालक संचालक रामदास डुबे, सुनिल नागरे, रमेश बांगर, एकनाथ आंधळे, मधुकर जाधव, मंगेश पुंड, रखमाजी लांडे, नवनाथ पाखरे, अभय सोनवणे, विलास काकडे, विशाल काळे, राजेंद्र पावसे, रोहिणी नवले, नारायण घेरडे, सचिन मोकाशी, महेश जगताप, डॉ.धर्माजी फोफसे, सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर, वरिष्ठ सहाय्यक नफीसखान पठाण, सभासद बाळासाहेब आंबरे, अशोक नरसाळे, शहाजी नरसाळे, सुभाष गर्जे, श्रीकांत जर्‍हाड, अनिल भाकरे, मनिष लोखंडे, अनिल भोईटे, भैय्यासाहेब कोठुळे  आदींसह सर्व सभासद ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते.
प्रारंभी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा मानद सचिव एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एकनाथ ढाकणे म्हणाले की, ग्रामसेवकांसाठी कामधेनू असलेल्या पतसंस्थेचे कामकाज अतिशय पारदर्शीपणे व शिस्तबध्दरित्या सुरु आहे.पोटनियम दुरुस्तीलाही सर्वांनी एकमताने मंजुरी दिलेली आहे.  ग्रामसेवकांची सर्वांगीण प्रगती केंद्रस्थानी ठेवून 52 वर्षांपासून संस्था वाटचाल करीत आहे. भविष्यातही असाच उत्कृष्ट कारभार कायम राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चेअरमन विजयकुमार बनाते म्हणाले की, ग्रामसेवकांचे एकमुखी नेतृत्त्व एकनाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक पतसंस्थेची घोडदौड कायम असून सातत्याने सभासद हिताचे निर्णय घेण्यात येत आहे. महाराष्ट्राला दिशा देणारी पतसंस्था म्हणून नगरच्या ग्रामसेवक पतसंस्थेची ओळख आहे. सर्व सभासद, संचालकांच्या सहकार्यातून चेअरमन म्हणून अनेक चांगले निर्णय घेता आले. ग्रामसेवक सन्मानाने समाजात उभा राहिला पाहिजे या दृष्टीने आमचे प्रयत्न असतात. पतसंस्थाचा नावलौकिक वाढविण्यासाठी कायम प्रामाणिकपणे काम करण्यात येते. व्हा.चेअरमन शितल पेरणे-खाडे यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post