नगर शहर व जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 4 हजार कोटींचा निधी...शनिवारी होणार भूमीपूजन

 केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नगरमध्ये येणार एकाच मंचावर


नगर-करमाळा- टेंम्भूणी रस्ता व शहर व जिल्ह्याला जोडणारा विविध महामार्गाचा होणार शुभारंभ 

4074.70 कोटी रूपये मंजूर करून शहर व जिल्हावासीयांना गिफ्ट - 
महेंद्र भैय्या गंधे 


नगर   - अहमदनगर जिल्ह्यातील विविध चार महामार्गांचे भूमिपूजन आणि चार महामार्गांचे लोकार्पण २ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. नगर शहराजवळ केडगाव परिसरात शनिवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी पवार आणि गडकरी एकत्र येत आहेत.

नगर शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चांची महामार्गांची कामे मंजूर झालेली आहेत. त्यांचे भूमिपूजन या दिवशी होणार आहे. यामध्ये नगर-करमाळा हा महामार्गा चार पदरी होणार आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. सावळीविहिर ते नगर बायपास रुंदीकरण, नगर-भिंगार रस्ता रुंदीकरण यासह राष्ट्रीय राखीव निधीतून दुरूस्तीच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. याशिवाय नगर-दौंड, नगर- कडा- जामखेड, कोपरगाव वैजापूर अशा काम पूर्ण झालेल्या रस्त्यांचे औपचारिक उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत, असेही गंधे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे पदाधिकारी सुनील रामदासी, सचिन पारखी, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, विवेक नाईक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post