केंद्राचा मोठा निर्णय.... तब्बल ३९ औषधांच्या किंमती होणार कमी

 केंद्राचा मोठा निर्णय.... तब्बल ३९ औषधांच्या किंमती होणार कमीनवी दिल्ली: केंद्र सरकारने काही गंभीर आजारांवरील औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. कॅन्सर विरोधी औषधे, मधुमेह, टीबी, अँटीव्हायरल, अँटीबॅक्टीरियल, अँटीरेट्रोव्हायरल आणि कोविड उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांसह सुमारे ३९ औषधांच्या किमती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना माेठा दिलासा मिळाला आहे. 

केंद्रीय आराेग्यमंत्री यांनी अत्यावश्यक औषधांची नवी यादी ‘आयसीएमआर’तर्फे आयाेजित एका कार्यक्रमात जाहीर केली. औषध विषयक राष्ट्रीय स्थायी समिती आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल ॲनालिसिस यांनी या यादीतील औषधांची निवड केली. त्यानंतर नीती आयाेगाने त्यास अंतिम मंजुरी दिली. ‘वर्ल्ड वेल बिईंग ऑर्गनायझेशन’ने अत्यावश्यक औषधांच्या यादीत बदल केले हाेते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post