सेवा सहकारी संस्थेत 35 लाखांचा अपहार, अध्यक्ष, संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल

सेवा सहकारी संस्थेत 35 लाखांचा अपहार, अध्यक्ष, संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखलश्रीगोंदा :  तालुक्यातील अधोरेवाडी येथील गहिनीनाथ सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, तसेच संस्था पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक आणि बँक कर्ज अधिकारी, अशा बारा जणांवर अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

२०१४ ते २०१९ या आर्थिक वर्षात ३४ लाख ७७ हजार ३३३ रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा लेखापरीक्षक महेंद्र काशीनाथ गवळी यांनी संबंधितांवर दाखल केला आहे. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी दिलेल्या आदेशावरून शासकीय लेखापरीक्षक महेंद्र काशीनाथ गवळी यांनी अधोरेवाडी येथील गहिनीनाथ सेवा सहकारी संस्थेचे १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ या आर्थिक वर्षे कालावधीतील चाचणी लेखापरीक्षण केले असता तब्बल ३४ लाख ७७ हजार ३३३ रुपयांचा अपहार आढळून आला.

संगनमत करून कमाल मर्यादेपेक्षा जास्त कर्जवाटप, पूर्वीचे कर्ज असताना नव्याने कर्जवाटप, धारणक्षेत्र नसताना कर्जवाटप, संस्थेचे पदाधिकारी, सचिव आणि जिल्हा बँक कर्ज अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून नातेवाइकांना आणि स्वतःला कर्ज वाटप केले आणि रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बारा जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post