मंत्रालयातील तब्बल 300 अधिकार्‍यांना हलविले...वर्षानुवर्षे मांडले होते ठाण

मंत्रालयातील तब्बल 300 अधिकार्‍यांना हलविले...वर्षानुवर्षे मांडले होते ठाण मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी  मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल 300 अधिकाऱ्यांची फेरबदली केली आहे. हे अधिकारी अनेक वर्ष एकाच विभागात तळ ठोकून होते. त्यामुळे एखाद्या सचिवापेक्षाही जास्त ‘पॉवर’ हे अधिकारी दाखवत होते. टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची फेरबदल केली. मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात तळ ठोकून होते. ते केवळ खात्यांचे सचिवच नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली झाले होते. कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांना बदलू शकत नव्हते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले. `प्रदीर्घ विचारानंतर, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post