25 हजारांची लाच...मंडलाधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

25 हजारांची लाच...मंडलाधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

 


सांगली : जमिनीसंदर्भातील तक्रारीच्या सुनावणीचा निकाल बाजूने देण्याच्या मोबदल्यात ७० हजार रुपयांची मागणी करत त्यापैकी २५ हजार रुपये लाच स्विकारल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. संगणक ऑपरेटरकरवी ही लाच घेण्यात येत होती. याप्रकरणी कुपवाडचा मंडल अधिकारी श्रीशैल उर्फ श्रीकांत विश्वनाथ घुळी (वय ५६, रा. शिवाजीनगर, मालगाव ता.मिरज) आणि संगणक ऑपरेटर समीर बाबासाहेब जमादार (वय ३६, रा. मल्लेवाडी ता.मिरज) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री उशिरा कारवाई केली. ‘लाचलुचपत’च्या पथकाने राजवाडा परिसरातील मंडल अधिकारी कार्यालयात सापळा लावला. यात संगणक ऑपरेटर जमादार याने लाचेची मागणी करत २५ हजार रुपये स्विकारल्यानंतर त्यास पकडण्यात आले. तर घुळी याच्या सांगण्यावरुन लाच स्विकारण्यात आल्यानेही त्यासही ताब्यात घेण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post