पक्षविरोधी काम नगरसेवकांना भोवले भाजपचे नगरसेवक निलंबित

 पक्षविरोधी काम नगरसेवकांना भोवले भाजपचे नगरसेवक निलंबितनेवासा -नगरपंचायतीमधील भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडून आलेले  रणजीत दत्तात्रय सोनवणे व दिनेश प्रताप व्यवहारे  या दोन नगरसेवकांना पक्षविरोधी काम केल्याने भारतीय जनता पार्टीतून निलंबित करण्यात आले असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केली.

नेवासा नगरपंचायतीची दुसरी निवडणूक एप्रिल 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर व तालुका भाजप अग्रेसर झालेले दिसून येत आहे. भाजपच्या तीन बैठका झाल्या असून त्यात प्रभाग निहाय अभ्यास व संपर्क सुरू करण्यात आलेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post