भुतवडा तलाव 100 टक्के भरला, शेतकरी व नागरिकांना दिलासा...पहा व्हिडिओ

 भुतवडा तलाव 100 टक्के भरला, शेतकरी व नागरिकांना दिलासा...पहा व्हिडिओजामखेड (नासीर पठाण): घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे जामखेड शहराची जीवनदायी असलेला भुतवडा तलाव शंभर टक्के भरला असुन सांडवा ओसंडून वाहत आहे. अनेक दिवसांपासून शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता तलाव भरल्याने परिसरातील शेतकरी व शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील फक्त भुतवडा तलावच भरला आहे. बाकी तलावातील पाणीसाठा  25 ते 30 टक्केच आहे. घाटमाथ्यावरील जोरदार पावसामुळे भुतवडा तलाव शंभर टक्के भरला आहे अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता रामभाऊ ढेपे यांनी दिली. भुतवडा तलाव हा 119 दशलक्ष घनफूट आहे तर जोडतलावाची पाणी साठवणूक 56 दशलक्ष घनफूट आहे जोडतलाव भरल्यावर ते पाणी भुतवडा तलावात येते दोन्ही तलाव शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दि. 4 रोजी दुपारी घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू झाला तो रात्रभर सुरू होता त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ रामेश्वर धबधब्याच्या वरती असलेला भुरेवाडी तलाव भरला आहे. रामेश्वर धबधबा ओसंडून वाहत आहे. मोठी धार पडत आहे. पण सध्या कोरोना महामारीमुळे पर्यटकाला तेथे जाण्यासाठी बंदी आहे. भुरेवाडी तलाव भरून रात्रीतच भुतवडा तलाव  टक्के भरला आहे. व मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे खाली असलेल्या रत्नापूर तलावातील पाणीसाठा वाढण्यास मदत होत आहे.भुतवडा तलावातून जामखेड शहराला पाणीपुरवठा होत आहे. विना लाईटचा संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होत असतो पण आता शहराची लोकसंख्या पाहता भुतवडा तलावातील पाणी शहराला पुरत नाही त्यामुळे गेल्या वर्षापासून जामखेड शहरात आठ दिवसांतून एकदा एक तास पाणी मिळत आहे. शहर वाशियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून उजणी धरणातून  कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली आहे सहा महिन्यात काम पुर्ण होईल.

व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post