नगर तालुक्याच्या राजकारणात खळबळ... 10 संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेश...video

 


नगर तालुक्याच्या राजकारणात खळबळ...दूध संघाच्या 10 संचालकांचा राष्ट्रवादीत प्रवेशनगर : परिवार संवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नगरमध्ये आले असताना नगर तालुक्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नगर तालुका सहकारी दूध संघाच्या दहा संचालकांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. रोहिदास कर्डिले यांच्या पुढाकारातून झालेल्या या पक्षप्रवेशावेही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार, प्रताप ढाकणे, गोविंद मोकाटे, बाळासाहेब जगताप, किसनराव लोटके, बाबासाहेब भिटे, प्रकाश पोटे, केशव बेरड, निखिल शेलार आदी उपस्थित होते. मोहन तवले, भाउसाहेब काळे, गोरक्षनाथ काळे, बजरंग पडळकर, रामदास शेळके, पुष्पा कोठुळे, वैशाली मते, राजाराम धामणे, उध्दव अमृते, स्वप्निल बुलाखे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. आ.कर्डिले आणि रोहिदास कर्डिले यांनी नगर तालुक्याच्या राजकारणात येत्या काळात मोठा धमाका दिसेल असे सांगत भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. 

video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post