रक्षाबंधनाच्या दिवशी डाक विभागाचे वतीने राखी वाटपासाठी विशेष मोहीम

 रक्षाबंधनाच्या दिवशी डाक विभागाचे वतीने राखी वाटपासाठी विशेष मोहीम

  रविवारी सुट्टी असताना कर्मचाऱ्याचा उस्फुर्त प्रतिसाद

केडगाव : बहीण भावाच्या अतूट  नात्यातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन..!!

बहिणीने पाठवलेली राखी भावाच्या हाती वेळेवर पडावी,

याकरिता रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी असताना ही डाक विभागाच्या वतीने  राखी वाटपासाठी विशेष मोहीम राबवली आहे.

नोकरी ,व्यवसाया निमित्ताने अनेकांना आपल्या घरापासून दूर राहावे लागते. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत आपल्या जिवलगाची प्रत्यक्ष भेट होत नाही.अश्या वेळी पोस्टाने राखी पाठविण्यास प्राधान्य दिले जाते.कोविड परिस्थितीमुळे  पोस्टाने राख्या पाठविण्याच्या प्रमाणात खुप वाढ झाली आहे. या सर्वच राख्या सुरक्षितपणे वेळेत पोहचविण्यासाठी डाक विभाग नेहमीच प्राधान्य देत असते.

रक्षाबंधन हा सण रविवारी आल्याने, व रविवारची सुट्टी असतानाही,डाक विभागाने राखी वाटप करण्यासाठी विशेष मोहीम राबवली,या मोहिमेद्वारे अहमदनगर विभागातील सर्वच डाकघराकडून रक्षाबंधनाच्या दिवशी आलेल्या सर्व राख्या भाऊरायाकडे पोहच केल्या.

 आज रक्षाबंधनाच्या दिवशी केडगाव पोस्टऑफिसमध्ये रजिस्टर्ड पोस्ट, स्पीड पोस्ट व सध्या पोस्टाने 55  राख्या वितरणासाठी प्राप्त झालेल्या सर्व  राख्या पोस्टमनद्वारे वितरित करण्यात आल्या.रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीने पाठवलेली राखी  भाऊरायाच्या हाती मिळताच  त्याच्या चेहऱ्यावरील आनंद निश्चितच समाधान देणारा होता.

ही विशेष मोहीम अहमदनगर विभागात राबविणेकरिता मा श्री एस रामकृष्ण  प्रवर अधिक्षक डाकघर अहमदनगर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

 केडगाव पोस्टऑफिसमध्ये श्री संतोष यादव उपडाकपाल यांनी सर्वश्री शिवाजी कांबळे,अंबादास सुद्रीक,स्वप्नील पवार,श्री संजीव पवार,अनिल धनावत ,श्री सूर्यकांत श्रीमंदिलकर ,श्री बाबासाहेब बुट्टे या पोस्टमनबांधवाच्या  उस्फुर्त सहकार्यमुळे ही विशेष मोहीम यशस्वी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post