नगर तालुक्यातील ‘या’ गावात साकारणार राज्यातील पहिले सासू, सुनेचे एकत्रित स्मारक

 नगर तालुक्यातील वाळकी गावात साकार होणार ,

राज्यातील पहिले सासू, सुनेचे एकत्रित स्मारक नगर (राजू खरपुडे यांजकडून)-    सासू, आणि सून म्हणजे विळ्या भोपळ्याचे  नाते .एकमेकांच्या पक्क्या हाड वैरी.त्या  दोघी चे सारखे तू,तू, मैं, मैं चालले असते .सासू कधी आई होत नाही आणि सून कधी मुलगी होत नाही.पण समाजात वावरताना असे ही काही सासू, आणि सून आपल्याला आढळतात की  त्या माई लेकी प्रमाणे एकत्र नांदतात. त्यांच्या कडे पाहिल्यावर लक्षात येत नाही की ह्या सासू , सून आहेत की  माई लेकी .इतके त्यांचे नाते घट्ट असते .

अशीच सासू, आणि सून यांची जोडी  वाळकी तालुका अहमदनगर येथे होती .स्वर्गीय आसरा बाई कोंडीबा लोखंडे ह्या सासू आणि स्वर्गीय सुमनताई लोखंडे ह्या सून होत्या .सासू कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आसरा बाई लोखंडे आणि आदर्श सून कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुमन लोखंडे .स्वर्गीय आसरा बाई लोखंडे यांनी कष्ट करून आपल्या मुलाला शिकवले .मुलगा शिकून शिक्षक झाला .मुलासाठी शिकलेली बायको शोधली. 
तिला पुढील शिक्षणा साठी पुणे येथे  ठेवले .सून शिक्षिका झाली .हे सर्व सासू आसरा बाई लोखंडे यांनी गवत विकून , मोलमजुरी करून  आपल्या मुलाला आणि सुनेला स्वतःच्या पायावर उभे केले. सून सुमन ताई लोखंडे यांच्या लहान पणी त्यांचे माता पित्याचे छत्र हरपले होते. त्यांनी आपल्या सासू ला आई मानून त्याची सेवा केली .सासूच्या  आज्ञा त्यांनी पाळली.स्वतः शिक्षिका असताना  त्याचा बडेजाव न  मिरवित्ता  सदैव सासूची सेवा केली.सुमनताई लोखंडे यांचे चिरंजीव सामाजिक  कार्यकर्ते आणि प्राथमिक शिक्षक असणारे अशोक आबा लोखंडे यांनी आपली आजी म्हणजे स्वर्गीय आसरा बाई लोखंडे यांच्या स्मरणार्थ आसरा बाई लोखंडे सेवा भावी संस्था स्थापन केली आहे. संस्थे मार्फत सामाजिक उपक्रम हाती घेतले आहे.आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.निराधार , वंचित घटक ,महिला यांना मदत केली जाते.आपल्या आजी चे स्मारक ते वाळकी गावात उभारत आहेत . 
 प्राथमिक शिक्षक अशोक आबा लोखंडे हे आपल्या आजी आणि आई यांचे म्हणजे आदर्श सासू,सून यांचे एकत्रित स्मारक बांधत आहेत. हा स्मारक बांधण्याचा एकमेव उद्देश म्हणजे या स्मारकपासून  प्रत्येक सासू,सून यांनी  प्रेरणा घ्यावी . स्मारकाचे लोकार्पण सोहळा 14 मार्च 2022 रोजी सुमनताई लोखंडे यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्त   होणार आहे 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post