सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट कराल तर सावधान! पोलिसांची व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांना नोटीस

 सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट कराल तर सावधान! शहापूर पोलिसांची व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांना नोटीसशहापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंमधील वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही जोरदार राजकीय वारे वाहताना पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल केल्या जात आहे. त्यात काही पोस्ट आक्षेपार्ह आहेत. मात्र, शहापूर पोलिसांनी अशा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिलाय. शहापूर पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन आणि सदस्यांना नोटीस बजावली आहे

शहापुरात काल भाजपच्या एका कार्येकर्त्याने सोशल मीडियावर मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. तर शिवसेनेच्या एका कार्येकर्त्याने नारायण राणे यांच्याबद्दल कोंबडी चोर अशी पोस्ट व्हायरल केली. या संदर्भात दोन्ही पक्षाचे कार्येकर्ते एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जात होते. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्येकर्त्यांची समोरासमोर भेट झाली आणि त्याचं रुपांतर तुंबळ हाणामारीत झालं. या संदर्भात शहापूरमधील कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडू नये यासाठी शहापूर पोलिसांनी आज शहापूर, वशिंद, किन्हवली, कसारा, खर्डी या सर्व पोलीस स्टेशनमार्फत सोशल मिडिया ग्रुप अँडमिन आणि ग्रुपमधील सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post